परराज्यात गेलेले कामगार राज्यात पुन्हा परतु लागले
लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरु झाले आहेत. त्यामुळे कामगार कामावर परतू लागले आहेत. परराज्यात गेलेले कामगारही राज्यात पुन्हा परत येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात परत येणाऱ्या सर्व कामगारांची नोंद, थर्मल तपासणी आणि होम क्वॉरंटाईन करण्यात येत आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परत येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास १५.५० हजार कामगार येत आहेत.
www.konkantoday.com