नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकांच्या प्रमुखांबाबत एक वेगळाच अनुभव मंत्री उदय सामंत यांनाच आला
निसर्ग वादळाने कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकांच्या प्रमुखांबाबत एक वेगळाच अनुभव समोर आला आहे. केंद्रीय पाहणी पथकाच्या प्रमुखांनी गरम पाण्याने डोकं थंड करण्यासाठी पाहणी दौरा बाजूला करुन थेट महाड गाठलं.हा अनुभव उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनाच आल्याने त्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली.
उदय सामंत म्हणाले, ‘केंद्रीय पथकाच्या इतर सदस्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. पण त्यांचे चेअरमन मात्र अत्यंत बिझी होते.दापोलीत त्यांना नेटवर्क मिळत नसल्यानं ते कावरेबावरे झाले होते. शिवाय, डोक्यावर गरम पाणी नसेल, तर डोकं थंड होणार नाही असं सांगत त्यांनी थेट महाड गाठलं.’ केंद्रीय पथकाच्या प्रमुखांच्या या वागण्यावर उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय पाहणी पथकाच्या इतर सदस्यांकडून चांगलं सहकार्य मिळाल्याचंही नमूद केलं.
www.konkantoday.com