जिल्हयात काल सायंकाळपासून 6 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 465 झाली आहे. आज कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून 3 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 346 झाली आहे. 17 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.बरे होणाऱ्या रुग्णांची प्रमाण 74.4 टक्के आहे.
सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 103 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 1 दापोली बाजारपेठ, बोंडवली येथील 2 , गोळप येथील 1, निरुळ येथील 1 आणि मच्छी मार्केट, रत्नागिरी येथील 1 रुग्ण आहे.
(ही माहिती रुग्णांनी दाखल होताना नोंदविलेल्या पत्त्यानुसार आहे असे जिल्हा रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.)
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 465
बरे झालेले – 346
मृत्यू – 17
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 103
(यात एक रुग्ण पुन्हा भरती झालेला आहे.)
जिल्ह्यात सध्या 51 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 12 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 01, खेड तालुक्यात 9 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 1, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 10 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 5 आणि मंडणगड मधील 01 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 7, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 2,कोव्हीड केअर सेंटर पेढांबे-2 , कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड – 5, उपजिल्हा रुग्णालय गुहागर-2, कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 6, कोव्हीड केअर सेंटर साडवली संगमेश्वर -3, असे एकूण 28 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 44 हजार 418 इतकी आहे.
आत्तापर्यंत 7 हजार पेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 8 हजार 79 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 803 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 465 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 7 हजार 318 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 276 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 276 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 162 अहवाल मिरज आणि 110 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 18 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 42 हजार 287 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 70 हजार 133 आहे.
www.konkantoday.com
Back to top button