
खासदार सुनिल तटकरे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे निसर्ग वादळात नुकसान झालेल्या खाजगी शैक्षणिक संस्थाना प्रथम मदत मिळणार
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नामुळे कोकणातील निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना आता दुप्पट मदत मिळणार आहे. यासाठी ३५० कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. विशेष म्हणजे खा. तटकरे यांच्या प्रयत्नामुळे नुकसान झालेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांना प्रथमच नुकसान भरपाई दिली जाणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे, रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता व विविध खात्यांचे सचिव उपस्थित होते.
www.konkantoday.com