एक गांव भुताचा ही सिरियल सुरू,कोकणातील कलाकारांना एक पर्वणीच
काल रत्नागिरी मधील कलाकारांच्या आयुष्यातील एका महत्वाच्या टप्प्याला सुरूवात झाली ती म्हणजे झी टीव्ही वर एक गांव भुताचा ही सिरियल सुरू झाली आहे कोकणातील कलाकारांना एक पर्वणीच आहे आणि ती मिळाली आहे कोकणचा लाडका स्टार कलाकार वैभव मांगले यांच्या मुळेच काल या सिरीयलचा पहिला भाग प्रसारीत झाला आणि संपूर्ण युनिटने तो एकत्रित पाहिला त्यानंतर या सिरियलचे लेखक श्री राजू घाग आणि श्री वैभव मांगले यांनी त्यांना मार्गदर्शन केले कोतुक केले. रत्नागिरी मधील कलाकारांना ही संधी उपलब्ध करून दिलेबद्दल आणि आमच्या नाचणे गावात शुटिंग केलेबद्दल आम्ही व सर्व टीमच्या वतीने श्री वैभव मांगले यांचा सत्कार माजी पोलीस पाटील श्री लंबोदर करमरकर यांच्या हस्ते सत्कार केल्याचे सामाजिक नेते व नाचणे गावचे संताेष सांवत यांनी सांगितले तसेच लेखक राजू घाग आणि निर्माती प्रमुख प्रफुल्ल घाग यांचे ही शाब्दिक आभार मानले यावेळी आमच्या सोबत समीर ईंदुलकर,आप्पा रणभीसे,जयूपाखरे उपस्थित होते.
www.konkantoday.com