
संगमेश्वरात जलजीवन मिशन कामात अनियमितता
संगमेश्वर तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत विशेष गावांसाठी नळपाणी योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र या योजनेत अनियमितता दिसून येत असून तशा तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील जलजीवन मिशन कामातील अनियमितता तक्रार अर्जावर कार्यवाही करत कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात साडेतीन कोटींपेक्षा जास्त निधी नळपाणी योजनांसाठी मंजूर करण्यात आला असून हा निधी खर्च करण्यास पाणी पुरवठा देवरूख उपविभाग अपयशी ठरला आहे.www.konkantoday.com