रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथे घराला आग, २ लाखांचे नुकसान
रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर नमसले वाडीमधील श्रीमती सविता गजानन नमसले यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे २ लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. श्रीमती सविता नमसले, मुलगा शुभम नमसले हे दोघे घराला आग लागली असतानाही सुखरूप बाहेर पडले. मात्र यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com