
तिवरे दुर्घटनाग्रस्तांना घरे बांधून देणार ,नामदार गिरीश महाजन
तिवरे येथील धरण फुटून जी दुर्घटना झाली ही दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा नामदार गिरीश महाजन यांनी चिपळूण कामथे येथे बोलताना दिला .या दुर्घटनेत जे मृत झाले आहेत त्यांना प्रत्येकी पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या घटनेत ज्यांची घरे वाहून गेली आहेत त्यांना चार महिन्यांत घरे बांधून दिली जातील असे महाजन यांनी सांगितले.