निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी ३६०कोटी निधी मंजूर ना.उदय सामंत
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी ३६०कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये रत्नागिरीला १५० कोटी रुपये मिळणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात ९३ टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत, शिवाय मदतीचे वाटप देखील सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, निसर्ग चक्रीवादळात रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचे नुकसान झालेली आहे. यामुळे कोकण आयुक्त यांनी शासनाकडे ३६० कोटी रुपये निधीची मागणी केली होती. ती मागणी काल मुख्यमंत्री यांच्यासमवेत आपल्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्याता दिली.
www.konkantoday.com