
जर्मनी दौऱ्यावरून परतातच ना. उदय सामंत ह्यांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवला.
इंडिगोच्या १०८ कामगारांना नियुक्तीपत्र देण्याबाबत सकारात्मक चर्चा

जर्मनी येथून मुंबईत परतताच महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांची आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई इंडिगो एरलाइन्सचे प्रमुख देवेश गौर आणि मुंबई इगले एरलाइन्सचे प्रमुख बेन्नी फर्नांडीस यांनी भेट घेतली.

शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्टस् एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनतर्फे इंडिगोच्या १०८ कामगारांना नियुक्तीपत्र देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून एअरलाईन्सकडून याबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगत या प्रसंगी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी आभार मानले.

या प्रसंगी शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इंडिगो कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





