
लोटे पोलीस दूरक्षेत्र आवारातून लक्झरी गाडी चोरून नेली
खेड तालुक्यातील लोटे पोलीस दूरक्षेत्र आवारात स्लीपरकोच गाडी नं. एन.एल. ०१-एक्स/१५०० ही गाडी उभी करून ठेवण्यात आली होती. यातील आरोपी निखिल फाबिया (रा. चाळीसगांव, जळगांव), आसिफ युसूफ सय्यद (रा. चाळीसगांव, जळगांव), व तिसरा अनोळखी इसम या इसमाची ही गाडी चोरून नेली. सदरची गाडी ३६ सीटर असून अंदाजे या गाडीची किंमत १५ लाख रुपये आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल भुषण सावंत यांनी खेड पोलीस स्थानकात गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली आहे.
www.konkantoday.com