राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने दिला गरजूंना मदतीचा हात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समितीने सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू, मास्क, धान्य, आर्सेनिक अल्बमच्या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभागातील कर्मचारी, रूग्णांच्या अन्नधान्याची पाकिटे, फेसशिल्डचे वाटत करण्यात आले. हातावर पोट असलेल्या कामगार व त्यांच्या कुटुंबियांना महिनाभर पुरेल इतक्या धान्याचे वाटप करण्यात आले.
संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यात ५०० हून अधिक कुटुंबाना शिधावाटप, सागरी किनारपट्टीवरील गावात ५०० मास्क, फूड पॅकेटसचे वाटप करण्यात आले. देवरूख शहरातील पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार अशा २५० जणांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
या सर्वांना फेसशिल्ड देण्यात आले. एक हजार कुटुंबांना आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. जनकल्याण समितीचे अध्यक्ष गोविंद पटेल, कार्यवाह महेश नवेले यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकार्यांनी ही मदत गरजुंपर्यंत पोहोचवली.
www.konkantoday.com