रत्नागिरी जिल्हयात आगामी तीन दिवस जिल्ह्यात जोरदार वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता
रत्नागिरी जिल्हयात आगामी तीन दिवस जिल्ह्यात जोरदार वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तविली आहे. मान्सून वेळेवर आणि समाधानकारक वाटचाल करीत असल्याने जिल्ह्याच्या खरीप क्षेत्रात बेगमीच्या कामांना वेग आला आहे.
गेले सलग तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून बुधवारही पावसाने जोर धरला होता. काही भागात मुसळधार सरी कोसळणे सुरू असताना संपूर्ण जिल्हाभर संततधार कायम होती.
www.konkantoday.com