
यापुढे कोरोनाचा रिपोर्ट थेट रुग्णांना दिला जाणार नाहीत- आरोग्यमंत्री राजेश टोपे
यापुढे कोरोनाचा रिपोर्ट थेट रुग्णांना दिला जाणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. असे केल्यास कोणतीही लक्षणे नसलेली व्यक्ती देखील तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात दाखल होते. खासगी रुग्णालयात गरज नसताना त्यांना ऑक्सिजन आणि आयसीयू दिले जाते. त्यामुळे इतर रुग्णांना जागा मिळत नाहीत. खाजगी रुग्णालये लक्षणे नसलेल्या लोकांना दाखल करून घेतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे रुग्णांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. ज्या रुग्णांना खरंच बेडची गरज आहे त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com