
पाच वर्षाहून अधिक काळ सुरक्षारक्षक असलेल्या ५७ सुरक्षा रक्षकांच्या नोकरीवर गदा?
महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्की) यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील एस.टी. आगाराचे सेवेत पाच वर्षाहून अधिक काळ सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ५७ सुरक्षा रक्षकांना एक महिन्याची आगाऊ नोटीस देत आपली नियुक्ती समाप्त करण्यात येत असल्याचे पत्र दिल्याने जिल्ह्यातील सर्व आगारात कार्यरत असलेले सुरक्षारक्षक अडचणीत आले असून त्यांच्या समोर रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय सांगली यांच्यावतीने क्षेत्रिय व्यवस्थापक यांनी सुरक्षारक्षकांना पत्र देत याबाबत सुचित केले आहे. गेल्या तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे खालावलेल्या आर्थिक परिस्थितीस सामोरे जात असतानाच काम सुरू करणार्या सुरक्षारक्षकांना कामावरून अचानक कमी केले गेल्याने ते चिंतेत सापडले आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एस.टी. आगारात मेस्को अंतर्गत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. या सुरक्षारक्षकांना मेस्कोकडून पगार दिला जात होता.
www.konkantoday.com