
निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या आंबडवे गावचे पुनः सर्वेक्षणाची केंद्रीय समितीकडे मागणी
निसर्ग चक्रीवादळामुळे मंडणगड, दापोली तालुक्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातून आलेल्या समितीने बुधवारी तालुक्यातील नुकसानग्रस्त झालेल्या गावांना भेटी देवून पाहणी केली आहे. केंद्र समितीमुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त झालेल्या भागाला केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळण्याची अपेक्षा तालुकावासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आंबडवे गावचे सर्वेक्षण चुकीचे झाले असल्याने केंद्रीय समितीकडे पुनः सर्वेक्षणाची मागणी ग्रामस्थांनी समितीकडे केली आहे.
www.konkantoday.com