त्वरित उत्पन्न मिळविण्यासाठी कोकणातील नुकसानग्रस्त बागायतदारांनी कंदपिके घ्यावीत, कृषी विद्यापीठाचे आवाहन
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील बागायतदारांनी त्वरित उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने कंदपिके घ्यावीत असे आवाहन दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले आहे.
निसर्ग चक्रीवादळात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील बागायतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. बागा स्वच्छ करून पुन्हा लागवड केली तरी त्यापासून उत्पन्न मिळायला सहा सात वर्षे जाणार आहेत. त्यामुळे एवढ्या कालावधीत उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न तेथील बागायतदारांना निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com