केंद्राकडून जास्तीत जास्त मदतीची आशा -ना. उदय सामंत
निसर्ग चक्रीवादळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातील अध्यक्षांना कनेक्टीव्हीटी नसल्याने त्यांनी दापोली सोडली असली तरी त्यांच्या समितीचे सदस्य दापोलीत ठाण मांडून हाेते असेसांगत जास्तीत जास्त मदत केंद्राकडून मिळेल अशी आशा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी दापोली येथे व्यक्त केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ७१४ गावे निसर्ग चक्रीवादळात बाधित झाली असून एकूण ९४ जनावरे मृत झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. जिल्हाभरात एकूण १७७० घरांचे पूर्णतः नुकसान झाले असून एकूण ४१ हजार ३०६ घरांचे अंशतः नुकसान झाल्याचे सांगत हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com