वाहून गेलेल्या शृंगारपूर-कातुर्डी रस्त्याची आ. शेखर निकम यांच्याकडून पाहणी
पहिल्याच पावसात वाहून गेलेल्या शृंगारपूर-कातुर्डी रस्त्याची आमदार शेखर निकम यांनी पाहणी केली. बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरून सदर रस्त्यावरून दोन दिवसात एसटी वाहतूक सुरू करा असे आदेश आ. निकम यांनी दिले आहेत.
नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर मान्सूनपूर्व पावसात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. सदरचा रस्ता अधिक धोकादायक झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेवून आ. निकम यांनी सदर रस्त्याची पाहणी केली. प्रधानमंत्री ग्र्रामसडक योजनेचे मुख्य अभियंता श्री. काटकर, शाखा अभियंता श्री. माने, श्री. अविनाश सिद्धपुरे आदी यावेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com