रघुवीर घाट व किंजळे नातू मार्गावरील दरडी हटविण्यात प्रशासनाला यश
खेड जवळील किंजळे नातू मार्गावर तसेच रत्नागिरी व सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणार्या रघुवीर घाटात पहिल्या जोरदार पावसामुळे दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. किंजळे तर्फे नातू महामार्गावर दरड आणि माती आल्याने पाच दिवासांपासून वाहतूक बंद होती. याबाबतची दखल तहसिलदार प्राजक्ता घोरपडे यांनी घेवून या मार्गावरील दरड हटवून हा मार्ग मोकळा केला तसेच रघुवीर घाटात देखील कोसळलेली दरड बाजूला काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.
www.konkantoday.com