
मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकही उद्योग नाही, प्रदूषणविरहित उद्योग आणू अशी भरभक्कम आश्वासने देणार्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० याचा शुभारंभ नुकताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला होता. यावेळी विविध १२ देशातील गुंतवणुकदारांसोबत १६००३ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आला. यामध्ये अभियांत्रिकी, वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टीक, रासायनिक, अन्न प्रक्रिया या क्षेत्रातील उद्योग येणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये अमेरिका, द. कोरिया, सिंगापूर आदी देशातील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांबरोबर करार करण्यात आले आहेत. या सर्व करारांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही उद्योग नाही. राज्याच्या उद्योगराज्यमंत्री असणार्या अदिती तटकरे यांनी मात्र आपल्या रायगड जिल्ह्यात उद्योग खेचून आणण्यात यश मिळवले आहे. याशिवाय रायगडमध्ये ऑईल ऍण्ड गॅसचा ७६० कोटींचा गॅस प्रकल्प, १५०० कोटींचा व २५०० चा रोजगार देणारा लॉजिस्टीक प्रकल्प व ५००० कोटी आणि ३ हजार रोजगार देणारा केमिकल प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. उर्वरित उद्योग पुणे, अहमदनगर, भिवंडी, ठाणे, तळेगांव आदी भागात नेण्यात आले आहेत.
कोकणातील स्थानिक लोकप्रतिनिधी व शिवसेनेने नाणार येथील रिफायनरीचा प्रकल्प प्रतिष्ठेचा करून हा प्रकल्प रद्द केला होता. हा प्र्रकल्प प्रदूषणकारी असल्याचे सांगुन त्यांनी आपण जनतेबरोबर असल्याचा दावा केला होता. तसेच नाणारविरोधी संघर्ष समितीच्या नेत्यानीही या प्रकल्पाला प्र्रदूषणाच्या कारणास्तव विरोध केल्याचे सांगितले होते. त्यावेळी या सर्व नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी कोकणातील तरूणांना रोजगार मिळण्यासाठी आम्ही कोकणात प्रदूषणविरहित प्रकल्प आणण्याची मोठमोठी आश्वासने दिली होती परंतु महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर उद्योग येवूनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही उद्योग आणण्यात यातील लोकप्रतिनिधी यशस्वी झाले नसल्याचे आताच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.
कोकणात अन्न प्रक्रिया प्रकल्पापासून ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आदी प्रकल्प आणता आले असते परंतु प्रकल्प घालवण्याबाबतीत पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी प्रकल्प आणण्यात मात्र मागे का पडतात हा प्रश्न जनतेला पडला आहे.अन्न प्रक्र्रिया प्रकल्प अहमदनगरमध्ये होणार असून इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन प्रकल्प पुणे-रांजणगाव येथे होणार आहे तर ऑटो व इंजिनिअरिंग प्रकल्प देखील पुणे येथे होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील तरूणांना रोजगाराची स्वप्ने दाखवणार्या या नेत्यांनी आता तरी पुढाकार घेवुन यातील प्रदूषणविरहित प्रकल्प रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी आपली ताकद दाखवून द्यावी अशी जनतेची मागणी आहे. नाहीतर केवळ पुढार्यांच्या आश्वासनांवरच येथील बेरोजगार तरूणांना आयुष्यभर स्वप्न बघतच बसावे लागणार आहे. रायगडच्या लोकप्रतिनिधींनी जे करून दाखवले ते रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे प्रकल्प जिल्ह्यात आणण्यास यशस्वी ठरलेले नाहीत. त्यामुळे कोणाचीही सत्ता असली तरी मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये देखील कोकणवासियांच्या वाट्याला नेहमीप्रमाणे उपेक्षा आली आहे.

Rainy season is on
FabSeasons Reversible Waterproof Raincoat Adjustable Hood Reflector at Back Night Visibility. Pack Contains Top, Bottom Storage Bag
Price: starting from ₹ 725.00 ( click on below link to purchase)
