महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनाच्या मृत्यूचे दडवून ठेवलेले आकडे अखेर समोर आले –विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात प्रशासकीय यंत्रणांनी कोरोनाच्या मृत्यूचे दडवून ठेवलेले आकडे अखेर समोर आले आहेत. मात्र, आता या प्रक्रियेला फेरतपासणीचे गोंडस नाव देण्यात आले आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून मृतांची खरी आकडेवारी लपवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.देवेंद्र फडणवीस यांनी कालच ICMRच्या दिशानिर्देशांचे पालन न करता राज्यातील कोरोनाच्या मृतांचा खरा आकडा लपवला जात असल्याचा आरोप केला होतायासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले होते. यानंतर काल प्रशासकीय यंत्रणांकडून मुंबईतील ८६२ आणि राज्यातील ४६६ कोरोना मृतांचे आकडे नव्याने जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता राज्यातील कोरोना मृतांच्या आकडेवारीत १३२८ जणांची भर पडली आहे. त्यामुळे अखेर सत्य समोर आलेच. आता सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
www.konkantoday.com