
भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले ,चीनच्या मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या ४३ वर पोहोचली
भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही अधिकृत माहिती दिली. मंगळवारी दुपारी भारतीय सेनेचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. तर, १७ जवान हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, आता हे १७ जवान देखील शहीद झाले आहेत. त्यामुळे भारत-चीन संघर्षात आतापर्यंत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, या संघर्षात चीनच्या मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या ४३वर पोहोचली आहे.
www.konkantoday.com