पावसाचे पाणी साठवण्यासाठी जनतेने पुढाकार घेण्याची गरज
पावसाचे पाणी साठवण्यासाठी आता जनतेने पुढाकार घेण्याची गरज असून जलवर्धिनी प्रतिष्ठानमार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाणार असल्याचे उल्हास परांजपे यांनी सांगितले आहे. जून महिन्यात फेरोसिमेंट यांच्या टाक्या बांधणे सहज शक्य आहे. जमिनीखालील व जमीनीवरील जलकुंड फेरोसिमेंटने जमिनीखाली बांधण्यात येणारे जलकुंड, नारळाच्या काथ्या, अंबाडी, केळीचे धागे वापरून तयार केलेेले जलकुड नैसर्गिक धागे वापरून पाणी साठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले आहे. फेरोसिमेंटच्या टाक्यांचे आयुष्य ३० वर्षाहून अधिक राहते. पावसाचे पाणी साठवण्यासाठी या टाक्यांचा पर्याय अधिक उपयुक्त असल्याचे मत उल्हास परांजपे यांनी व्यक्त केले आहे.
www.konkantoday.com