
नोकरीसाठी विझा देतो असे सांगून तरूणाची ऑनलाईनद्वारे फसवणूक
ए.आर.टी.सी. दुबई या कंपनीत सुपरवायझर या नोकरीसाठी फिर्यादी तरूणाला विझा पाठविण्यासाठी १२ हजार फोन पे ऑनलाईन ऍपद्वारे स्विकारून १२ हजाराची फसवणूक केल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मे ते ८ जून या कालावधीत घडली.
अनिरूद्ध सुरेश करंजकर (२६,खेंड, चिपळूण) यांनी तक्रार दिल्यानुसार दि. २७ मे ते ८ जून या कालावधीत अज्ञात व्यक्तीने अलाहाबाद बँक मुंबई या शाखेचा खाते क्रमांक देऊन एन.आर.टी.सी. दुबई या कंपनीत सुपरवायझर या नोकरीसाठी जाण्यासाठी फिर्यादीला विझा पाठविण्याचे आमिष दाखवून त्यासाठी २० हजार बँकेत भरण्यास सांगितले. दिलेल्या बँक खात्यात करंजकर याने दि. २७ मे रोजी २ हजार रुपये तर दि. ८ जून रोजी १० हजार रुपये फोन पे ऍपद्वारे ट्रान्सफर केले. यामुुळे करंजकर यांची १२ हजाराची फसवणूक झाली आहे.
www.konkantoday.com