कोरोनावर संशोधन केलेल्या आमच्या आयुर्वेदिक पॅटर्नला शासनाने मान्यता देण्याची चिपळूणच्या अनुपमा कदम यांची मागणी
सध्या कोरोच्या फैलावामुळे सगळे जग कोरोनाची लस करण्यासाठी धडपडत असताना चिपळूण येथे राहणार्या अनुपमा कदम यांनी भस्म व जडीब्युटीचा वापर करून केलेल्या औषधामुळे रूग्ण बरे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्या या औषधाला अमेरिका व जर्मन देशातून मागणी होत असली तरी आम्हाला देशासाठी आधी काम करायचे असल्याने भारत सरकारने आम्ही तयार केलेल्या औषधाच्या पॅटर्नला मान्यता द्यावी अशीही मागणी अनुपमा कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. चिपळूण येथील अनुपमा कदम व त्यांचे पती अमोल कदम यांनी गेले दीड वर्ष कोकणातील जंगलात भटकंती करून जडीब्युटीचा अभ्यास केला होता. त्यांनी गेल्या १० वर्षापासून वेगवेगळ्या आजारांवर २२ औषधे बनविली आहेत. सध्या त्या केेरळमधील आयुर्वेदिक शिक्षण संस्थेमधून पदवी घेत आहेत.
www.konkantoday.com