केश कर्तनालये सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी व विशेष आर्थिक सहाय्य मिळावे या मागणीसाठी नाभिक समाज हितवर्तक समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने टाळेबंदी जाहीर केली होती. नाभिक समाजाने केशकर्तनालये पूर्णपणे बंद ठेवून शासनाच्या आदेशाचे पालन केले होते. त्यानंतर इतर दुकानांना परवानगी मिळाल्यानंतर टाळेबंदीच्या चौथ्या सत्रानंतर केशकर्तनालये खुली करण्याचे आदेश मिळाल्यानंतर शासनाने ज्या अटी घातल्या होत्या त्या अटींचे पालन व्यावसायिकांनी केले होते. त्यामध्ये ग्र्राहकांची नोंद, सोशल डिस्टंसिंग, हॅण्डग्लोजचा वापर, सॅनिटायझर या गोष्टी काटेकोपणे पाळून दुकाने सुरू झाली होती. त्यामुळे तीन महिने बंद असलेली दुकाने सुरू होवून आता रोजीरोटी मिळेल असे वाटत असताना शासनाने केशकर्तनालये व ब्युटीपार्लर बंद ठेवण्याचा नवा आदेश दिल्याने व्यावसायिक संकटात आले आहेत.
केशकर्तन हाच आमचा पिढीजात व्यवसाय असून आमची त्यावरच रोजीरोटी आहे. आम्हा कोणाच्याही शेतीवाडी, बागायती वा अन्य व्यवसाय नाहीत. याशिवाय अनेक व्यावसायिकांनी आपली केशकर्तनालये व ब्युटीपार्लर भाड्याच्या जागेत घेतलेली आहेत. आता शासनाच्या आदेशाप्र्रमाणे अनिश्चित काळाकरता दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने दुकानाचे भाडे, वीजबिल, कुटुंबाचा खर्च, औषधाचा खर्च आदी प्रश्न व्यावसायिकांसमोर उपस्थित झाले आहेत.
तीन महिने दुकाने बंद ठेवल्याने जेरीस आलेल्या कुटुंबावर आता नव्या आदेशाने उपासमारीची वेळ आली आहे. व्यावसायिकांतर्फे सद्यस्थितीत सर्व्हिस चार्जमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. तसेच अनोळखी ग्राहक सुद्धा घेण्याचे थांबवण्यात आले होते. तसेच केशकर्तनालयामुळे राज्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण सापडलेला नाही. त्यामुळे सर्व केशकर्तनाल चालक शासनाच्या नियमांचे पालन करण्यास तयार आहेत. त्यामुळे आता शासनाने केशकर्तनालये व ब्युटीपार्लय सुरू करण्याची परवानगी द्यावी असे निवेदन मंडळाच्यावतीने देण्यात आले आहे.यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले.यावेळी श्रीकृष्ण चव्हाण (अध्यक्ष), प्र्रकाश हातखंबकर (उपाध्यक्ष), बाळकृष्ण चव्हाण (शहर अध्यक्ष), मंदार शिंदे (सचिव), नितीन जाधव (खजिनदार)व इतर सदस्य उपस्थित होते.
www.konkantoday.com
☔🌧Rainy season is on⛈☔
FabSeasons Reversible Waterproof Raincoat Adjustable Hood Reflector at Back Night Visibility. Pack Contains Top, Bottom Storage Bag
Price: starting from ₹ 725.00 (If you want to purchase click on below image)