आमदार योगेश कदम यांनी दापोली तालुक्यातील चक्रीवादळाने बाधित झालेल्या दुर्गम गावांची केली पहाणी
दापोली :- (वार्ताहर)दापोली मतदारसंघाचे तरुण आमदार योगेश कदम यांनी निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील दुर्गम भागातील बांधतिवरे, साकुर्डे, धनकोली, कादिवली, वेळवी, रेवली, पिचडोली, दळखन, देहेण, सुकोंडि, बोरथळ वाघिवणे, आडे शिवाजी नगर या गावांमधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. व तेथील नुकसानग्रस्त उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले. व स्थानिक आमदार या नात्याने आपण तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहोत घाबरण्याचे कारण नाही .शासना कडून आपणास जास्तीतजास्त मदत कशी मिळवून देताएईल या साठी आपण प्रयत्नशील राहू असे त्यांनी या वेळी अश्वासन दिले
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे शासकीय पंचनामे योग्य झाले आहेत की नाही याची देखील आपण पडताळणी करू मात्र कोणीही खचून न जाता खंबिरपणे उभ राहयला पाहिजे असा धीर देखील दयायला ते विसरले नाहीत.
मी दापोली तालुक्यातील सर्व दुर्गम गावांची पहाणी करणार असून तेथील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत.असे
त्यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी जि.प.सदस्या रेश्मा झगडे, माजी प.स.सभापती दिप्तीताई निखार्गे, माजी उपसभापती, तालुका संघटक श्री. उन्मेश राजे, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री. निलेश शेठ, युवसेना तालुका अधिकारी श्री. सुमीत जाधव, महिला संघटीका अडखळ गण स्नेहल जंगम, कृषी समितीचे माजी सभापती श्री. मधुकर दळवी, श्री. सुनिल दळवी, श्री. दत्ताराम राजे, श्री. प्रसाद कर्वे, नायब तहसीलदार, प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
www.konkantoday.com