मुंबईतून येणारे चाकरमानी आपलेच आहेत ही भावना जपून डोर्ले ग्रामपंचायतीने खबरदारी घेऊन गाव ठेवले कोरोनामुक्त

रत्नागिरी तालुक्यात चाकरमान्यांचा डोर्ले गावातील ओघ वाढत असतानाच ग्रामपंचायत आणि ग्राम कृतिदलाने डगमगून न जाता चाकरमान्यांना विलगीकरणात ठेवण्यावर भर दिला. त्यासाठी गावातील बंद घरांवर लक्ष केंद्रित केले. एकमेकांमध्ये अंतर राखणे, मास्क वापरणे यासारख्या उपाययोजनांवर ग्रामपंचायतीने सर्वाधिक भर दिला. त्यामुळे शेकडो चाकरमानी येऊनही डोर्ले गाव कोरोनामुक्त ठेवणे शक्य झाले आहे.मुंबईतून येणारे चाकरमानी आपलेच आहेत ही भावना जपून त्यांची योग्य व्यवस्था डोर्ले ग्रामपंचायतीने केली. या चाकरमान्यांना होम क्वारंटाईन करून त्यांची ग्रामपंचायतीने वेळोवेळी काळजी घेतली. त्यांची खाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना रेशन उपलब्ध करून दिले. जवळपास 300 चाकरमानी डोर्ले गावात दाखल झाले आहेत. गावातील बंद घर ताब्यात घेऊन तेथे चाकरमान्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले.सुदैवाने या गावात कोणीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. आशा सेविका ज्योती बिर्जे आणि कविता कुवार, अंगणवाडी सेविका पूजा पाटील, तृप्ती गुरव यांनी या काळात विशेष काळजी घेतली.डोर्ले-दाभिळ गावची लोकसंख्या 1 हजार 490 इतकी आहे. त्यांना सॅनिटायझरदेखील प्रत्येक कुटुंबाला वाटण्यात आले. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर, सरपंच शरयू पाटकर, उपसरपंच प्रकाश कुड, ग्रामसेवक प्रवीण चौधरी यांनी महत्वाची भूमिका बजावली. ग्राम कृतिदल समिती सदस्य, वाडी कृतिदल समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, उपकेंद्रातील आरोग्य खात्याचे कर्मचारी यांची साथ लाभली.
www.konkantoday.com

Looking For an Iphone📲


Apple iPhone Xs Max (64GB) – Gold


Price-₹ 69,900.00/- ( If you want to buy click on Image)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button