
महामार्ग चौपदरीकरणाबाबत निर्णयाची ग्रामस्थांना माहिती नाही, संभ्रमावस्था कायम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा सर्वाधिक फटका ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या संगमेश्वर बाजारपेठेला बसणार आहे. मुळातच अरूंद असलेल्या बाजारपेठेत नक्की किती व कधी चौपदरीकरण होईल याबाबतची साशंकता अद्यापही कायम आहे.
कसबा येथील शास्त्रीपुल ते संगमेश्वर एस.टी. बसस्थानकासमोरील सोनवी पुलापर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. चौपदरीकरणाला कोणीही विरोध केलेला नाही. ४५ की ३० मीटर रूंदीकरण याचा खुलासा अद्यापही राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने न केल्याने सर्वसामान्यांसह व्यापारी अद्यापही चिंताग्रस्त आहेत.
www.konkantoday.com
Looking For an Iphone📲
Apple iPhone Xs Max (64GB) – Gold
Price-₹ 69,900.00/- ( If you want to buy click on below link)
