
चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष महंमद फकीर वयाच्या ५५ व्या वर्षी दहावी पास
चिपळूण : नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महंमद फकीर हे दहावीची परीक्षा वयाच्या ५५ व्या वर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ६८ टक्के गुण त्यांनी मिळवले आहेत. नववी इयत्तेतून त्यांनी शाळा सोडली. काही वर्षानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत राष्ट्रवादीतून नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणून काम केले. महाराष्ट्र उर्दु हायस्कूलमधून १७ नंबरचा फॉर्म त्यांनी भरून हे यश मिळवले. या परीक्षेत त्यांना उर्दुमध्ये ५८, मराठीमध्ये ५५, इंग्रजीमध्ये ७०, बीजगणित ६९, विज्ञान ७२, समाजशास्त्रामध्ये ७५ असे ५०० पैकी ३४४ गुण मिळाले.
यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून परदेशात आहेत.




