ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील एमआयडीसी आणि इतर 35 हजार कारखान्यांना परवानगी
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील ग्रामीण विभाग हा ग्रीन झोन मध्ये असल्याने तेथे अत्यावश्यक कारखान्यासह सर्वच कारखान्यांना परवानग्या देण्यात आल्याने तेथील उद्योग व्यवसाय दणदणीत सुरू आहेत. मुंबई प्राधिकरण आणि महानगरपालिका तसेच कन्टोनमेंट क्षेत्राला उद्योगांना अद्यापि परवानगी नाकारण्यात आली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील एमआयडीसी आणि इतर 35 हजार कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. यात 24 हजार 500 युनिट सुरू झाले असून या कारखान्याच्या माध्यमातून 6 लाख 4 हजार कर्मचारी दैनंदिन हजेरी लावत आहे.
www.konkantoday.com