एसटीच्या मालवाहतुकीला रत्नागिरीतूनही प्रतिसाद
एसटी महामंडळ अनेक कारणांमुळे नुकसानीत असताना एसटीने आता मालवाहतुकीच्या क्षेत्रात भरारी घेतली असून प्रवासी वाहतुकीत असलेली एसटीची विश्वासार्हता आणि सुरक्षितता यामुळे एसटीने आता सुरू केलेल्या मालवाहतुकीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी विभागात सध्या सहा मालवाहतूक ट्रकमधून मालाची वाहतूक करण्यात येत असून यामध्ये लवकरच चार मालवाहूक ट्रकांची भर पडणार आहे. मुंबई-पुणे याबरोबरच कोल्हापूर, सातारा, सांगली, पंढरपूर यासह संपूर्ण राज्यात मालवाहतुकीची सेवा पुरवण्यात येत आहे.
www.konkantoday.com