
रत्नागिरीत उद्या होणार मराठी रंगभूमी दिन
मराठी रंगभूमी दिन ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात साजरा होणार आहे. या वर्षी स्पर्धात्मक आणि उत्सवी रंगभूमीवर काम केलेले ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. गजानन रानडे गावखडी (पावस) यांचा सन्मान नाट्यपरिषदेच्यावतीने करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन व्हावे या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा रत्नागिरी उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा रत्नागिरी, नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सभा पार पडली. या सभेदरम्यान रंगभूमी दिन विशेष कार्यक्रम नियोजन करण्यात आला आहे. त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे- या कार्यक्रमामध्ये नटराज पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. नाट्यपरिषदेच्यावतीने ज्येष्ठ रंगकर्मींचा सन्मान करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी स्पर्धात्मक आणि उत्सवी रंगभूमीवर काम केलेले ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. गजान रानडे गावखडी (पावस) यांचा सन्मान नाट्यपरिषदेच्यावतीने करण्यात येणार आहे. सादरीकरणे या विशेष औचित्याने काही सादरीकरणे प्रतिवर्षी प्रमाणे येथे करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शास्त्रीय नृत्य, एकपात्री प्रवेश, रेकॉर्ड डान्स आदी प्रकारातील मर्यादित सादरीकरण येथे होणार आहेत. तरी इच्छुकांनी वामन कदम, अमेय थोपटकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com