आता कटकटीचे काम सोपे बनणार, चिपळुणातील सुहास खरे यांनी बनविले फणस कापण्याचे यंत्र
फणस कापणं म्हणजे तसे कटकटीचे काम, त्यातही कोयती आणि कुर्हाडीचा वापर होत असल्याने महिलांना तर फणस कापणे फारच अवघड जाते. पण आता काळजी करायचे कारण नाही. चिपळूण येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे सुहास खरे यांनी फणस कापण्याचे यंत्र (जॅकफ्रूट कटर) बनविला असून यामुळे फणस कापणे आता अगदी सोपे झाले आहे.
या यंत्रामुळे फणस कापण्यासाठी लागणारा वेळ आणि लागणारे श्रम दोन्हीही कमी झाले आहेत. शिवाय महिलांनाही अगदी सहजपणे या यंत्राचा वापर करून फणस कापता येतो. चिपळूणमधील व्यावसायिक अभय अंतरकर हे फणसाचे तळलेले गरे विक्रीसाठी बनवतात. त्यासाठी त्यांना अनेक फणस फोडावे लागतात. मग त्यांनी सुहास खरे यांना फणस कापण्याचे यंत्र बनविण्यास सांगितले आणि खरे यांनी त्यांना हे यंत्र बनवूही दिले.
www.konkantoday.com
Looking For an Iphone📲
Apple iPhone Xs Max (64GB) – Gold
Price-₹ 69,900.00/- ( click on below image to buy)