हौसेला मोल नसते, कोरोनामुळे मास्क लावण्याच्या काळात बनविला चांदीचा मास्क

कोरोनाबरोबर आता जगायला शिका असे संदेश जगातील आरोग्य संघटना देत असल्यामुळे यापुढे आपल्याला अनेक महिने कोरोनाबरोबरच जगावे लागणार आहे. यामध्ये सॅनिटायझरबरोबरच महत्वाचा असलेला दुसरा घटक म्हणजे मास्क हा होय. सुरूवातीला मास्कचा तुटवडा होता परंतु आता मास्कची मागणी वाढल्याने मास्कमध्येही विविधता आली असून ऑनलाईनवर आता वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळत आहेत. स्त्रियांसाठी आता प्रत्येक ड्रेसला मॅचिंग असलेले मास्कही मिळू लागले आहेत. कोरोनाबरोबर जगायचे असले तरी आता लग्नकार्यात देखील मास्क वापरणे गरजेचे बनणार आहे. लग्नकार्य हे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होणार असले तरी लग्नकार्यासाठी दागिने व कपड्यांची हौस कायमच राहणार आहे. त्यात आता नव्या दागिन्याची भर पडली आहे आणि ती म्हणजे मास्कची. लग्नकार्यालयात वापरण्यात येणार्‍या भारी कपड्यांबरोबरच साध्या कापडाचा मास्क वापरणे तसे बरोबर दिसणार नाही. यामुळे आता अनेक सुवर्णकारांनी देखील शक्कल लढविली आहे.रत्नागिरीतील एक सुवर्णकार शा जसराज ज्वेलर्स यांनी आता चांदीचा मास्क बनवला आहे. सध्या ६० ग्रॅम वजनाच्या चांदीत हा मास्क बनवण्यात आला असून त्यामुळे आता लग्नकार्यात व समारंभात भारी कपडालत्त्याबरोबरच हा मास्कही शोभून दिसणार आहे. सध्या रत्नागिरीतील एका ग्राहकाने हा मास्क खरेदी केला असल्याचे सुवर्णकार शहा जसराज ज्वेलर्स यांनी सांगितले. या ग्राहकाने मास्कचा फोटो आणून दिला होता. त्याप्रमाणे या सुवर्णकाराने त्या डिझाईनमध्ये हा चांदीचा मास्क बनवून दिला. या चांदीच्या मास्कला अंदाजे ३९०० रुपये खर्च आला आहे.
www.konkantoday.com

Experience clyster clear sound without obstacle of wire


Redmi Earbuds S, Punchier Sound,Up to 12 Hours of Playback time, IPX4 Sweat & Splash Proof& DSP Environmental Noise Cancellation


price-1799/-₹ (click on below Image to buy)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button