मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली, ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करण्यात येणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली आहे. ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करण्यात येणार आहे. तसंच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या ठिकाणी पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा उघडता येतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिक्षण विभागासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक आयोजित केली होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या देखील या बैठकीत उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. लवकरच त्यासाठीची घोषणा केली जाणार आहे
www.konkantoday.com

Experience clyster clear sound without obstacle of wire


Redmi Earbuds S, Punchier Sound,Up to 12 Hours of Playback time, IPX4 Sweat & Splash Proof& DSP Environmental Noise Cancellation


price-1799/-₹ (To buy click on below Image)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button