बरे होणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्के, एकूण 431,ॲक्टीव्ह 109

रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 15–आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 431 आहे.  दिवसभरात 4 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.  त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी 70 टक्के झाली आहे.
            आत्तापर्यंत 17 मृत्यू झालले असून आता ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 109 इतकी आहे.  दिवसभरात कोव्हीड केअर सेंटर सामाजिक न्याय भवन येथील 3 आणि जिल्हा शासकीय रुग्णालय येथील एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.
आज सकाळपर्यंतचे 13 पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण
कळंबणी-9
रत्नागिरी-3
देवरुख-1
 
आज सायंकाळपर्यंतची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह -431
बरे झालेले          -305
मृत्यू                  – 17
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 109
 
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन संख्या आता 30
            जिल्ह्यात सध्या 30 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 3 गावांमध्ये,  गुहागर तालुक्यामध्ये   01, खेड तालुक्यात 04 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 02,  दापोली मध्ये 05 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 01, चिपळूण तालुक्यात 06  गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 06 आणि मंडणगड मधील 02 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
 संस्थात्मक विलगीकरण
            संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी –  20, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी –  2, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 2, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी 1, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड –  2,   कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 7, कोव्हीड केअर सेंटर साडवली संगमेश्वर -3  असे एकूण 37 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.  
 होम क्वारंटाईन
          मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 51 हजार 355   इतकी आहे.
 
 
 
आत्तापर्यंत 6 हजार 6836 अहवाल निगेटिव्ह
            जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 7 हजार 624 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 288  तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 431 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 6 हजार 836 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 336 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.   334 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 216 अहवाल मिरज आणि 116 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.  
            परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि.  14 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 36 हजार 26 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 63 हजार 650 आहे.

Experience clyster clear sound without obstacle of wire


Redmi Earbuds S, Punchier Sound,Up to 12 Hours of Playback time, IPX4 Sweat & Splash Proof& DSP Environmental Noise Cancellation


price-1799/-₹ ( click on below image to buy)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button