झी समुहाने कोरोना व्हायरसविरुद्धच्या सरकारी लढाईत सहभागी होत महाराष्ट्र सरकारला ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द केल्या
देशसेवेसाठी समर्पित असलेल्या झी समुहाने कोरोना व्हायरसविरुद्धच्या सरकारी लढाईत सहभागी होत महाराष्ट्र सरकारला ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द केल्या आहेत. यासोबतच इतर वैद्यकीय उपकरणेही मुंबई महापालिकेला देण्यात आली. मुंबईच्या बीकेसीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ऍम्ब्युलन्सच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
www.konkantoday.com