जिल्हा परिषदेच्या सभापतीनाच माहितीच्या अधिकारात उत्तर देण्यास ५ महिने टाळाटाळ
शासनाच्या खात्याकडून माहितीच्या अधिकारात अर्ज केल्यानंतर एका महिन्यात उत्तर येणे अपेक्षित असतानाच जि.प.चे बांधकाम सभापती यांनी जिल्हा परिषदेलाच माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज केला होता. परिचरांच्या बदल्यांबाबत व त्या बदल्या कशा पद्धतीने झाल्या याबाबत त्यांनी माहिती अधिकारात अर्ज केला होता. मात्र त्यांनी केलेल्या अर्जावर पाच महिन्याने जिल्हा परिषदेकडून उत्तर मिळाले. काल झालेल्या सर्वसाधारण सभेत ही गोष्ट झगडे यांनी सभागृहासमोर आल्यावर जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
www.konkantoday.com