कोकण रेल्वेच्या २५ ते ३० कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाइन केले
कोकण रेल्वेच्या सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन या बेलापूर विभागात काम करणारा कर्मचारी रोहा व कोलाड येथे कामासाठी आला होता.त्या ठिकाणी रत्नागिरीतूनही काही कर्मचारी गेले होते.सदरच्या बेलापूर येथील कर्मचाऱयांचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला होता व त्याचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. यामुळे कोकण रेल्वे विभागात खबरदारी म्हणून या कर्मचाऱ्याच्या संपर्कात इतर कर्मचारी आल्याची शक्यता असल्याने बेलापूर आणि कोलाड येथील कर्मचाऱयांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते.दरम्यान रत्नागिरीतून जे कर्मचारी त्यावेळी तेथे कामासाठी गेले होते त्या लोकांना देखील आता सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांची तपासणी करण्यात आली.रत्नागिरीतील रेल्वे लाईन स्टाफमधील २५ ते ३० कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांना आता सध्या क्वारंटाइन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com