कोकण आणि गोव्यात पुढील पाच दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या मान्सूननं राज्य व्यापलं आहे. नंदुरबार जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात मान्सून पसरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार आणि मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई आणि पुण्यात काल (१४ जून) मान्सून धडकला, अशीही माहिती हवामान विभागाने दिली. पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यात पुढील पाच दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या १८ जूनपर्यंत सर्वदूर ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल. त्याचबरोबर या परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button