आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत मसालाकींग डॉ. धनंजय दातार यांची आठव्या स्थानावर झेप

मुळचे कोकणातील असलेले व दुबईस्थित अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकींग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अरेबियन बिझनेस या जागतिक ख्यातीच्या माध्यमगृहाने २०२० साठीची यादी दि इंडियन बिलियनर्स क्लब या शीर्षाखाली नुकतीच प्रसिद्ध केली. केवळ दातार यांनी व्यवसायाची प्रगती आणि विस्तार परिश्रमपूर्वक घडवत आखाती देशातील ६ अब्जाधीश भारतीयांमध्ये स्थान मिळवले आहे. दातार यांना अनेक प्रतिष्ठीत संस्थांचे पुरस्कारही लाभले आहेत. सध्या कोरोनामुळे अनेक भारतीय आखाती देशामध्ये अडकून पडले असून अशा गरजू भारतीयांच्या मदतीसाठी दातार यांनी आतापर्यंत ३ हजारहून अधिक निर्धन भारतीयांना परतीच्या प्रवासाचे मोफत विमान तिकिट आणि वैद्यकीय चाचणीचा खर्चही उचलला आहे. महाराष्ट्रातून गेलेले सुमारे ६० हजार भारतीय अद्यापही दुबईत अडकून पडले आहेत. त्यांना लवकरात लवकर घरी परतता यावे यासाठी डॉ. दातार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचेशी संपर्क साधला. त्यांनी ठाकरे यांनी प्रतिसाद देवून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button