१५ जूनपर्यंत राज्य शासनाने सलूनची दुकाने सुरू करण्यासाठीची परवानगी न दिल्यास राज्य शासनाविरुद्ध आमरण उपोषण करण्याचा इशारा विविध नाभिक संघटनांचा इशारा
राज्य शासनाने १५ जूनपर्यंत सलून सुरू करण्याची परवानगी दिली नाही. तर महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी-चिंचवड कृती समिती, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे शहर, आणि ब्युटी थेरपी अॅन्ड कॉस्मोलॉजी आदींसह इतर नाभिक संघटनाद्वारे राज्य शासनाविरुद्ध आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला सलूनची दुकाने बंद असल्याने सलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहे. आर्थिक अडचणीत अडकलेल्या काही सलून व्यावसायिकांद्वारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न होत आहे. सलूनची दुकाने सुरू करण्याची विनंती अनेकवेळा राज्य शासनाला करूनही राज्य शासन या विनंतीला केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप सलून व्यावसायिकांनी या पत्रकार परिषदेत केला. त्याचप्रमाणे १५ जूनपर्यंत राज्य शासनाने सलूनची दुकाने सुरू करण्यासाठीची परवानगी न दिल्यास राज्य शासनाविरुद्ध आमरण उपोषण करण्याचा इशारा विविध नाभिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला.
www.konkantoday.com