भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी तत्परता दाखवली,प्रभागातील नागरीकांची गैरसोय दूर केली
शहरातील स्टेट बँक कॉलनी येथे दोन दिवसांपूर्वी प्रचंड पावसामुळे रात्रीच्या वेळी पाणी अंगणात घुसले. चुकीच्या गटारामुळे गटाराचे पाणी व त्यासोबत माती दारुच्या बाटल्या रसत्यावर व नागरीकांच्या घराच्या अंगणात आल्या,त्यावेळी भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी तत्परता दाखवून माती बाजूला करून दिली.
यापूर्वी नगरपालिकेला अनेकदा सूचित करूनही पालिकेने याकडे लक्ष न दिल्याने या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाणी वाढल्याने चारचाकीसुद्धा अडकून पडली होती. यासंदर्भात काही नागरिकांनी देसाई यांना रात्री कल्पना दिली. त्या वेळी देसाई यांनी तत्काळ पाहणी करून दुसर्या दिवशी स्वतः जातीनिशी थांबून जेसीबीच्या सहाय्याने माती बाजूला करून प्रभागातील नागरीकांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
www.konkantoday.com