
जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पोलिसांचे ऑपरेशन बीच सेफ
रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गरम्य समुद्रकिनारे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असले तरी, काही बेजबाबदार वाहनचालकांकडून वाळूत गाड्या घालून होणारी हुल्लडबाजी, अतिवेगाने वाहने चालवणे आणि त्यामुळे निर्माण होणारी असुरक्षितता, पर्यावरणाची हानी यासारख्या समस्यांनी डोके वर काढले होते. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्रमुख समुद्रकिनार्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी घालण्यासाठी प्रभावीपणे बॅरिकेंडिंग करण्यात येत आहे.
या मोहिमेची अंमलबजावणी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. दापोली पोलीस ठाणे हद्दीतीलल मुरूड, कर्दे आणि लाडघर या लोकप्रिय समुद्रकिनार्यांवर सध्या बॅरिकेंडिंग पूर्ण झाले आहे. याचप्रमाणे जयगड पोलीस ठाणे हद्दीतील बीचकडे जाणार्या रस्त्यांवर स्थानिक ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील
यांच्या मदतीने बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आरे आणि काजीरभाटी या सुंदर किनार्यांकडे जाणार्या रस्त्यांवरही वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ते अडथळे निर्माण करण्यात आले आहेत.www.konkantoday.com




