
केंद्रसरकारचा महाराष्ट्राला मदत कार्यात दुजाभाव : प्रा.आ.जोगेंद्र कवाडे
आम्ही संपूर्ण कोकणात पहाणी दौरा करीत आहोत लोकांची खूप दयनीय अवस्था आहे, कोरोना संकटकाळी आणि निसर्ग चक्रीवादळ काळात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीची लोकांसाठी दिलासादायक कामगिरी आहे,परंतु केंद्रसरकर महाराष्ट्राला मदतकार्यात दुजाभाव करीत आहे,आज संपूर्ण देशात जीएसटी स्वरूपात केंद्र सरकारला महाराष्ट्रातून सर्वाधिक उत्पन्न मिळते असे असतांना केंद्र सरकार ची राज्याला आणि कोकणाला मदत मिळने गरजेचे आहे, केंद्रातील भाजप सरकार कोकणातील नुकसानग्रस्त बंधवांच्या भावनेशी खेळत आहे असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा.आ.जोगेंद्र कवाडे यांनी चिपळुण येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला,
www.konkantoday.com