आधी कोरोनामुळे व आता निसर्ग वादळामुळे दापोलीसह अन्य तालुक्यातील पर्यटन व्यवसाय ठप्प

गेले काही दिवस कोरोनामुळे पर्यटक कोकण परिसरात फिरकले नसल्यामुळे आधीच ठप्प झालेला पर्यटन व्यवसायाला नुकत्याच झालेल्या निसर्गचक्रीवादळामुळे मोठा फटका बसला आहे. दापोली परिरातील कर्दे, हर्णै, आंजर्ले आदी भाग एप्रिल-मेच्या हंगामात पर्यटकांनी फुललेला असतो. मात्र कोरोनामुळे यावेळी पर्यटकच फिरकले नाहीत. त्यात ३ जूनला झालेल्या चक्रीवादळामुळे येथील पर्यटक, व्यावसायिक कोलमडून पडले आहेत. दापोली तालुक्यातील बरेचसे रिसॉर्ट समुद्रकिनारी आहेत. निसर्ग वादळचा तडाखा या रिसॉर्टना बसला असून अनेक रिसॉर्टचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आकडा मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय हे सर्व दुरूस्त करण्यातही मोठा कालावधी जाणार आहे. यामुळे सध्या तरी या भागातील पर्यटन व्यवसाय अतिशय अडचणीत आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button