
प्रस्तावित वाटद येथील एमआयडीसीला स्थानिकांचा विरोध
रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ वाटद येथे प्रस्तावित एमआयडीसी उभारण्यात येणार असून त्याला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. कोकण पर्यावरण रक्षण समितीने या एमआयडीसीला विरोध दर्शविला आहे. एमआयडीसीकडून प्रस्तावित एमआयडीसी उभारण्यात येणार असून त्यासाठी ९७८हेक्टर जागा घेतली जाणार आहे. एमआयडीसीने स्थानिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता भूसंपादन कायद्याचे उल्लंघन करीत ग्रामस्थांना नोटिसा धाडल्या आहेत.या ठिकाणी रासायनिक औद्योगिक वसाहत उभा करण्याचा घाट असल्याने त्याला विरोध आहे.याबाबत कोकण पर्यावरण रक्षक समितीच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकार्यांना निवेदन दिले या प्रस्तावित एमएडीसी बाबत स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. एमआयडीसीत कोणते प्रकल्प येणार आहेत व एमआयडीसीचे स्वरूप काय आहे याची कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
www.konkantoday.com