राज्यातून निवड झालेल्या रत्नागिरी शहर परिसरात भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडले?
निरनिराळ्या येणार्या वादळांमुळे अनेकवेळा किनारी भागात झाडांच्या फांद्या पडून व वृक्ष कोसळून तसेच वादळामुळे वीज खांब पडल्याने विद्युत वाहिन्या तुटून पडतात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होत असतो. यासाठी केंद्र शासनाने काही राज्यात भूमीगत विद्युत वाहिन्यांची योजना आखली आहे. महाराष्ट्रातील काही ठराविक निवडलेल्या शहरांमध्ये रत्नागिरीचा समावेश आहे. यासाठी केंद्र शासनाने विविध विद्युत वाहिन्यांसाठी ९४ कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ज्या भागातून ही भूमिगत वाहिनी जाणार आहे त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची यासाठी नाहरकत लागणार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी नाहरकत दाखला देण्यास विरोध केला आहे. यासाठी संस्थांना महावितरणाने पैसे द्यावेत अशी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका आहे. मात्र ही सरकारी योजना असल्यामुळे महावितरण असा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना देवू शकत नसल्याने हे काम आता रेंगाळले आहे. याबाबत आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत हे स्थानिक संस्थांशी चर्चा करून मार्ग काढणार आहेत.
www.konkantoday.com